Shooting At School In Sweden: स्वीडनमधील ओरेब्रो येथील शाळेत गोळीबार; 5 जण जखमी
स्वीडिश पोलिस सध्या सशस्त्र हल्लेखोरांना प्रत्युत्तर देत आहेत. या हल्ल्यात किती लोक सामील आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Shooting At School In Sweden: मंगळवारी युरोपीय देश स्वीडनमध्ये गोळीबाराची मोठी घटना घडली. येथे ओरेब्रो शहरातील एका शाळेत 5 जणांवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. या घटनेत पाचही जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी दुपारी राजधानी स्टॉकहोमपासून 200 किमी पश्चिमेला घडली. स्वीडिश पोलिस सध्या सशस्त्र हल्लेखोरांना प्रत्युत्तर देत आहेत. या हल्ल्यात किती लोक सामील आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
पोलिसांनी सांगितले की, दुपारी अज्ञात हल्लेखोरांनी शाळेत प्रवेश केला आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये 5 जण गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी प्रत्युत्तराची कारवाई सुरू केली आणि जखमींना रुग्णालयात नेले. हिंसाचारानंतर, विद्यार्थ्यांना सुरक्षिततेसाठी जवळच्या इमारतींमध्ये हलवण्यात आले.
स्वीडनमधील शाळेत गोळीबार -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)