Shocking Video: कराचीमध्ये गाडी थांबवल्यामुळे महिलेने मारली पोलिसांना थप्पड, केली मारहाण (Watch)
कराचीमध्ये रंगीत काच आणि फॅन्सी नंबर असलेल्या वाहनांविरुद्ध वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू आहे.
पाकिस्तानच्या कराचीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एआरवाय न्यूजने गुरुवारी दिलेल्या वृत्तानुसार, कराचीच्या पीआयडीसीजवळ एका महिलेने आपली ‘कार थांबवल्याबद्दल’ पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) यांच्यावर हल्ला केला तसेच त्यांना थप्पडही मारली. कराचीमध्ये रंगीत काच आणि फॅन्सी नंबर असलेल्या वाहनांविरुद्ध वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू आहे. माहितीनुसार, ही घटना कराचीमधील पाकिस्तान इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनजवळील वाहतूक विभागात घडली, जिथे एका ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्याने ‘फॅन्सी नंबर प्लेट्स आणि टिंटेड ग्लास लावल्यामुळे’ ही कार थांबवली होती. याच रागातून महिलेने पोलिसांना मारहाण केली. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये ही महिला पोलिसांसोबत धक्काबुक्की करताना दिसत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement