Viral Video: शाळेतील कर्मचाऱ्याची अपंग विद्यार्थ्याला मारहाण, व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. शाळेच्या कर्मचाऱ्याने बसमध्ये एका अंपग विद्यार्थ्याला मारहाण केली आहे
Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. शाळेच्या कर्मचाऱ्याने बसमध्ये एका अंपग विद्यार्थ्याला मारहाण केली आहे. ही घटना युएस येथील आहे. लिटलटन पब्लिक स्कूल्सची कर्मचारीने मारहाण केल्याचे समोर आले आहे. कियारा जोन्स असं लिटलटन पब्लिक स्कूलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, तीने अंपग विद्यार्थ्याला मारहाण केली. अनेकांनी या व्हायरल व्हिडिओला कंमेट केले आहे. युजर्संनी या आरोपीवर संताप व्यक्त केला आहे. एकाने असं लिहले आहे की, आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. दुसऱ्याने लिहलं आहे की, शिक्षकाने आणि पालकांनी याकडे दुर्लक्ष करून नयेत. योग्य ती कारवाई करा. हा संतापजनक व्हिडिओ पाहून अनेकांना अश्रु अनावर झाले आहे. आरोपीच्या वागणूकीमुळे विद्यार्थ्याला त्रास होत असल्याचे दिसून येत आहे.
(हेही वाचा-रमजानच्या पार्श्वभूमीवर कराचीच्या रस्त्यांवर चार लाखांहून अधिक भिकारी जमले