Same-Sex Couples: समलिंगी जोडप्यांना आशीर्वाद देण्यास Church of England राजी; 8 तासांची चर्चा व मतदानानंतर घेतला ऐतिहासिक निर्णय

त्यामध्ये वादविवादानंतर, चर्च ऑफ इंग्लंडच्या राष्ट्रीय असेंब्लीच्या जनरल सिनॉडने 250 मतांनी बिशपच्या प्रस्तावाला पाठिंबा दर्शविला.

Church of England

चर्च ऑफ इंग्लंडने समलैंगिक जोडप्यांना आशीर्वाद देण्यास परवानगी दिली आहे. आज याबाबत मतदान पार पडले व अखेर समलैंगिकतेबद्दल प्रशासकीय मंडळाच्या ऐतिहासिक मतानंतर चर्चच्या भूमिकेत बदल घडला आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये 2013 पासून समलिंगी विवाह कायदेशीर आहे, परंतु चर्च ऑफ इंग्लंडने तो बदल अजून स्वीकारलेला नव्हता. याआधी बुधवारी चर्चने एक निवेदन जारी केले होते की, ते आपल्या चर्चमध्ये समलिंगी विवाहांना परवानगी देऊ शकत नाही. मात्र चर्चने असेही सांगितले की समलिंगी जोडप्यांना आशीर्वाद मिळण्याची आणि इतर सेवांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्याचा विचार केला जाईल.

आता आज समलैंगिक जोडप्यांना आशीर्वाद देण्याबाबत 8 तास चर्चा झाली. त्यामध्ये वादविवादानंतर, चर्च ऑफ इंग्लंडच्या राष्ट्रीय असेंब्लीच्या जनरल सिनॉडने 250 मतांनी बिशपच्या प्रस्तावाला पाठिंबा दर्शविला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)