Russian Missile Strike in Ukraine: युक्रेनच्या खार्किव ओब्लास्टमध्ये रशियन क्षेपणास्त्र हल्ला; किमान 48 ठार, 6 जखमी

मृतांमध्ये एका 6 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. झेलेन्स्की यांनी या स्फोटाला, पूर्णपणे हेतुपुरस्सर दहशतवादाचे कृत्य म्हटले आहे.

Russian Missile Strike in Ukraine

युक्रेनच्या खार्किव ओब्लास्ट (Kharkiv Oblast) रशियन सैन्याने हल्ला केला आहे. या ठिकाणी रशियन रॉकेटने एका छोट्या किराणा दुकानाला धडक दिली. यामध्ये जवळजवळ 48 लोक ठार झाले तर 6 जण जखमी झाले. राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. झेलेन्स्कीचे चीफ ऑफ स्टाफ, आंद्री येर्माक आणि खार्किवचे गव्हर्नर ओलेह सिनीहुबोव्ह यांनी सांगितले की, रशियन सैन्याने खार्किव प्रदेशातील ह्रोझा (Hroza) गावात दुपारी 1 च्या सुमारास दुकान आणि कॅफेवर गोळीबार केला. मृतांमध्ये एका 6 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. झेलेन्स्की यांनी या स्फोटाला, पूर्णपणे हेतुपुरस्सर दहशतवादाचे कृत्य म्हटले आहे. (हेही वाचा: Brazil Plane Crash Video: Cuiabá च्या Bom Futuro Airport वर King Air plane चा विचित्र अपघात; टेक ऑफ नंतर क्षणात होत्याचं नव्हतं झालं)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now