Ram Katha At United Nations: युनायटेड नेशन्समध्ये गुंजणार रामाचे नाव; Morari Bapu न्यूयॉर्कच्या मुख्यालयात सादर करणार 'राम कथा'

मोरारी बापूंनी रामचरितमानसाचे सार श्रीलंका, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, केनिया, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, इस्रायल आणि जपान या देशांमध्ये पसरवले आहे.

United Nations (File Image)

Ram Katha At United Nations: संयुक्त राष्ट्र संघाने प्रसिद्ध कथाकार मोरारी बापू यांना श्री रामचरितमानस या पवित्र कथेचे पठण करण्यासाठी न्यूयॉर्कला आमंत्रित केले आहे. हे आमंत्रण स्वीकारून मोरारी बापू संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम यांची जीवनकथा सांगण्यासाठी अमेरिकेला पोहोचले. ही पहिलीच वेळ असेल जेव्हा मोरारी बापू संयुक्त राष्ट्रात रामकथेचे कथन करतील. मात्र, याआधीही त्यांनी अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये रामकथा कथन केली आहे. न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात पहिल्यांदाच रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे.

मोरारी बापू यांनी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात नऊ दिवसांच्या रामकथा प्रवचनाला सुरुवात केली. मोरारी बापू म्हणाले, ‘रामचरितमानसच्या शक्तीने आपल्या सर्वांना येथे आणले आहे. अनेक वर्षांपूर्वी मी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाच्या इमारतीला प्रदक्षिणा घातली होती. त्यावेळी, मी संयुक्त राष्ट्रांमध्ये कथा सदर करण्याचा विचारही केला नव्हता, परंतु कथेची इच्छा असेल म्हणून आज आम्ही येथे आहोत.’ मोरारी बापूंनी रामचरितमानसाचे सार श्रीलंका, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, केनिया, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, इस्रायल आणि जपान या देशांमध्ये पसरवले आहे. (हेही वाचा: Statue of Mahatma Gandhi In Tokyo: परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या हस्ते टोकियोमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण)

पहा पोस्ट- 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)