Rahat Fateh Ali Khan Viral Video: राहत फतेह अली खानने नोकराला केली बेदम मारहाण? पाकिस्तानी गायकाचा व्हिडिओ व्हायरल!

व्हिडिओ क्लिपमध्ये पाकिस्तानी गायक आपल्या नोकराला लोकांसमोर मारहाण करताना दिसत आहे. यावेळी तेथे उपस्थित लोकांनी गायकाला थांबवण्याचाही प्रयत्न केला. हा व्हिडिओ पाकिस्तानी उर्दू भाषेतील वृत्तवाहिनी समा टीव्हीने शेअर केला

प्रसिद्ध पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बॉलीवूड चित्रपटांमध्ये अनेक हिट गाणी गाण्यासाठी प्रसिद्ध असलेला राहत फतेह अली खान आपल्या घरातील नोकराला मारहाण करताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओबाबत दावा केला जात आहे की राहत फतेह अली खान आपल्या नोकराला दारूच्या बाटलीसाठी मारहाण करत आहेत.

व्हिडिओ क्लिपमध्ये पाकिस्तानी गायक आपल्या नोकराला लोकांसमोर मारहाण करताना दिसत आहे. यावेळी तेथे उपस्थित लोकांनी गायकाला थांबवण्याचाही प्रयत्न केला. हा व्हिडिओ पाकिस्तानी उर्दू भाषेतील वृत्तवाहिनी समा टीव्हीने शेअर केला असून, राहत फतेह अली खान हे आपल्या कर्मचाऱ्यांवर नेहमीच आक्रमक असल्याचे आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement