Pakistan Blocked Social Media Platform X: पाकिस्तान सरकारने घातली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर बंदी; न्यायालयाचे एक आठवड्यात निर्णय मागे घेण्याचे निर्देश
मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म 'सरकारच्या कायदेशीर सूचनांचे पालन करण्यात अयशस्वी ठरल्यामुळे' पूर्वी ट्विटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एक्सवर बंदी घालण्यात आल्याची माहिती पाकिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाने न्यायालयाला दिली होती.
Pakistan Blocked Social Media Platform X: पाकिस्तानने एलोन मस्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर बंदी घातली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव, पाकिस्तान सरकारने फेब्रुवारीमध्येच X वर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. मात्र आज पाकिस्तान सरकारने या बंदीला अधिकृत दुजोरा दिला आहे. मात्र पाकिस्तानच्या सिंध उच्च न्यायालयाने (SHC) सरकारला मायक्रो ब्लॉगिंग साइट एक्सवरील बंदी रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. अहवालानुसार, न्यायालयाने पाकिस्तान सरकारला एका आठवड्यात बंदी उठवण्यास सांगितले. पाकिस्तान सरकारने कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, एक्स प्लॅटफॉर्मच्या गैरवापराबद्दलच्या चिंता दूर करण्यात ट्विटर/एक्स अयशस्वी झाल्यामुळे ही बंदी आवश्यक बनली आहे.
मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म 'सरकारच्या कायदेशीर सूचनांचे पालन करण्यात अयशस्वी ठरल्यामुळे' पूर्वी ट्विटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एक्सवर बंदी घालण्यात आल्याची माहिती पाकिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाने न्यायालयाला दिली होती. (हेही वाचा: Starlink Receives Government Approval: लवकरच भारतामध्ये उपलब्ध होऊ शकते Elon Musk यांच्या स्टारलिंकची इंटरनेट सेवा; मंत्रालयाकडून मिळाली तत्वतः मान्यता)
Pakistan has announced the banning of the social media platform X in response to what it describes as the platform's failure to respect the country's sovereignty and address concerns over alleged misuse. pic.twitter.com/GG9XBXBeeX
— IANS (@ians_india) April 17, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 17, 2024 05:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

