Pakistan Air Force Station Attacked: पाकिस्तानात दहशतवादी हल्ला, हल्लेखोरांनी मियांवली एअरबेसला केले लक्ष्य, व्हिडिओ आला समोर
पाकिस्तानच्या हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला आहे. पंजाबमधील मियांवली येथील पाकिस्तानी हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला आहे.
Pakistan Air Force Station Attacked: पाकिस्तानातून धक्कदायक घटना समोर येत आहे. पाकिस्तानच्या हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला आहे. पंजाबमधील मियांवली येथील पाकिस्तानी हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला आहे. घटनास्थशावरून जोरदार गोळीबार होत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये मियांवलीतील पीएएफ तळावर जोरदार गोळीबार आणि स्फोटांचे आवाज ऐकू येतात.आत्मघाती बॉम्बर्ससह जोरदार सशस्त्र जिहादींनी पंजाबमधील मियांवली येथील पाकिस्तानी हवाई दलाच्या तळावर हल्ला केल्याचे वृत्त आहे. सध्या हा हल्ला सुरू असल्याचेही वृत्त आहे. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकापाठोपाठ बॉम्बस्फोटचे आवाज ऐकू येत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)