Nepal Road Accident: नेपाळमध्ये रस्ते अपघातात सात ठार, 9 जणांवर उपचार सुरु

नेपाळमधील उदयपूर जिल्ह्यात गुरुवारी सकाळी जीप महामार्गावरून घसरल्याने एका मुलासह सात जणांचा मृत्यू झाला. जिल्हा पोलिस प्रवक्ते रोशन थापा यांनी सिन्हुआ न्यूज एजन्सीला सांगितले की, "आम्ही नऊ जणांना जिवंत बाहेर काढले, ज्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत." जाणून घ्या अधिक माहिती

Accident (PC - File Photo)

Nepal Road Accident: नेपाळमधील उदयपूर जिल्ह्यात गुरुवारी सकाळी जीप महामार्गावरून घसरल्याने एका मुलासह सात जणांचा मृत्यू झाला. जिल्हा पोलिस प्रवक्ते रोशन थापा यांनी सिन्हुआ न्यूज एजन्सीला सांगितले की, "आम्ही नऊ जणांना जिवंत बाहेर काढले, ज्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत."

सिन्हुआ या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, ओव्हरलोड आणि उतार असलेल्या रस्त्यामुळे हा अपघात झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

जीपमध्ये 16 जण होते आणि ज्या ठिकाणी अपघात झाला ती जागा अतिशय अरुंद होती. नेपाळमध्ये वाहतूक अपघातात दरवर्षी शेकडो लोकांचा मृत्यू होतो.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement