London Bridge Fire Video: लंडन ब्रिजजवळ भीषण आग, रेल्वे वाहतूक विस्कळीत, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या दाखल

या आगीमुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे आणि आजूबाजूच्या इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत.

London Bridge Fire Video

इंग्लंडची राजधानी लंडनच्या युनियन स्ट्रीट, साउथवार्क येथील रेल्वे कमानीमध्ये मोठी आग लागल्याची माहिती मिळत आहे. नेटवर्क रेलने सांगितले की, या आगीमुळे चार रेल्वे लाईन्स बंद करण्यात आल्या आहेत, तर ट्यूबवरील ज्युबली लाइन देखील काही प्रमाणात निलंबित करण्यात आली आहे. लंडन फायर ब्रिगेड (LFB) ने सांगितले की, ट्रॅकच्या खाली असलेल्या संपूर्ण रेल्वे कमानीला आग लागली होती आणि अनेक मैलांवरून याचा धूर दिसून येत होता. या आगीमुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे आणि आजूबाजूच्या इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. ही आग विझवण्यासाठी दहा फायर इंजिन आणि सुमारे 70 अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement