Israeli Gaza War: इस्रायलचा दक्षिण गाझा पट्टीवर हवाई हल्ला, 71 जण ठार; 289 जखमी

ज्यात 71 जण ठार झाले. तर 289 लोक जखमी झाल्याचे समजते. त्याबाबतची माहिती गाझामधील आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Photo Credit -X

Israeli Gaza War: इस्रायलचा गाझावर हल्ला सुरुच आहे. गेल्या वर्षभरापासून तेथे मोठा नरसंहार पहायला मिळत आहे. तो काही थांबण्याचे नाव घेत नाही. दरम्यान, इस्रायलने शनिवारी देखील दक्षिण गाझा पट्टीवर पुन्हा हल्ला (Air Strike)केला. ज्यात 71 जण ठार झाले. तर 289 लोक जखमी झाल्याचे समजते. त्याबाबतची माहिती गाझामधील आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. खान युनूस परिसरात हा हल्ला झाला. यात हल्ल्यात 71 लोक मरण पावले आहेत. जखमींवर नासेर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. (हेही वाचा:Protesters Set Fire To The Israeli Embassy in Mexico: रफाहमधील हल्ल्यांविरोधात तीव्र निदर्शने; संतप्त जमावाने मेक्सिकोतील इस्रायली दूतावासाला लावली आग (Watch Video) )

पोस्ट पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)