Iran launched Missile On Pakistan: इराणने सुरु केले पाकिस्तानवर हवाई हल्ले; क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या सहाय्याने दहशतवाद्यांच्या ठिकाणांना केले जात आहे लक्ष्य
इराणने दावा केला की, त्यांनी मंगळवारी, 16 जानेवारी रोजी पाकिस्तानमधील बंडखोरांच्या ठिकाणांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले सुरू केले.
Iran launched Missile On Pakistan: इराणने नुकतेच पाकिस्तानवर एकत्रित क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले सुरू केले आहेत. ते पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील पंजगुरजवळ जैश अल-अदल दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करत असल्याचा इराणचा दावा आहे. सुन्नी अतिरेकी गट जैश अल-अदल मोठ्या प्रमाणावर सीमेपलीकडे पाकिस्तानमध्ये कार्यरत आहे. इराणने दावा केला की, त्यांनी मंगळवारी, 16 जानेवारी रोजी पाकिस्तानमधील बंडखोरांच्या ठिकाणांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले सुरू केले. (हेही वाचा: North Korea Vs South Korea: उत्तर कोरियाकडून दक्षिण कोरियाशी संबंध सुधारणा समिती रद्द, युद्धखोरीच्या भाषेसह 'शत्रू क्रमांक एक' म्हणून उल्लेख)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)