International Day of Yoga Celebrations at UN HQ Live Streaming: यूएन मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम PM Narendra Modi होणार सहभागी, पहा थेट प्रक्षेपण

संयुक्त राष्ट्र संघाने आयोजित केलेल्या या योग कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी , संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष कसाबा कोरोसी, अमेरिकेतील राजकीय नेते आणि भारतीय-अमेरिकन समुदायातील विविध क्षेत्रातील लोक सहभागी होणार आहेत.

Narendra Modi | (Photo Credits: ANI/ Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी अमेरिकेच्या दौऱ्यावर न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले. शहरातील जॉन एफ केनेडी विमानतळावर आलेल्या प्रवासी भारतीयांनी पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत केले. आज (बुधवारी-21 जून) संयुक्त राष्ट्र मुख्यालयात आयोजित योग दिन सोहळ्याचे नेतृत्व पंतप्रधान मोदी करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी  संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जागतिक समुदायासोबत योग करताना दिसणार आहेत. संयुक्त राष्ट्र संघाने आयोजित केलेल्या या योग कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी , संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष कसाबा कोरोसी, अमेरिकेतील राजकीय नेते आणि भारतीय-अमेरिकन समुदायातील विविध क्षेत्रातील लोक सहभागी होणार आहेत. टाईम्स स्क्वेअरवर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाईल. आज संध्याकाळी भारतीय वेळेनुसार साडेपाच वाजता हा कार्यक्रम सुरु होणार आहे. याआधी 2014 मध्ये, संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला. (हेही वाचा: Yoga Day 2023: 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा 'वसुधैव कुटुम्बकम' थीमवर देशभर उत्साह; CM Eknath Shinde ते राज्यपाल रमेश बैस यांनीही केला योगाभ्यास)

International Day of Yoga Celebrations at UN HQ: