Indian Doctor Arrested In US: भारतीय डॉक्टरला अमेरिकेत अटक; लहान मुले आणि महिलांची शेकडो नग्न छायाचित्रे व व्हिडिओ शूट केल्याचा आरोप

यापूर्वी त्याचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नव्हता. अनेक महिला बेशुद्धावस्थेत किंवा झोपेत असताना त्याने लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप ओकलँड काउंटी शेरीफने मंगळवारी केला.

Arrest | (Representative Image)

Indian Doctor Arrested In US: अमेरिकेत एका 40 वर्षीय भारतीय डॉक्टरला, अनेक वर्षांपासून लहान मुले आणि महिलांची शेकडो नग्न छायाचित्रे आणि व्हिडिओ काढल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 'फॉक्स न्यूज' टीव्ही चॅनलच्या रिपोर्टनुसार, ओमेर इजाज असे या आरोपीचे नाव असून, त्याला 8 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. टीव्ही चॅनलनुसार, एजाजने बाथरूम, चेंजिंग एरिया, हॉस्पिटलच्या रूम्स आणि घरातही अनेक ठिकाणी छुपे कॅमेरे लावले होते. वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, त्याने दोन वर्षांच्या लहान मुलांचेही फोटो काढले आणि व्हिडिओ बनवले.

शेरीफ माइक बौचार्ड म्हणाले की, या तपासाला काही महिने लागतील. इजाजला त्याच्या घरातून अटक केल्यानंतर त्याच्या मालकीच्या जागेची झडती घेतली गेली. यावेळी केवळ एका हार्ड ड्राइव्हमध्ये 13,000 व्हिडिओ सापडल्याचे बौचर्ड यांनी सांगितले. इजाज 2011 मध्ये वर्क व्हिसावर भारतातून अमेरिकेत आला होता. तो भारताचा नागरिक आहे. एजाजचे आणखी बरेच बळी असावेत असा प्राधिकरणाला संशय आहे. (हेही वाचा: आर्थिक वर्षे 2024 मध्ये शीर्ष भारतीय कंपन्यांमध्ये लैंगिक छळाच्या तक्रारी 40% वाढल्या; बँकिंग आणि तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये सर्वाधिक वाढ)

भारतीय डॉक्टरला अमेरिकेत अटक-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif