India-Pakistan Ceasefire: कॅथोलिक चर्चचे प्रमुख Pope Leo XIV यांनी केले भारत-पाकिस्तान युद्धबंदीचे स्वागत; व्यक्त केली वाटाघाटींमुळे कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होण्याची आशा

तीन दिवसांहून अधिक काळ झालेल्या तीव्र गोळीबारानंतर, भारत आणि पाकिस्तानने शनिवारी जमीन, हवाई आणि समुद्रातील सर्व गोळीबार आणि लष्करी कारवाई तात्काळ थांबवण्याबाबत युद्धबंदी केली. यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्ती केल्याचे वृत्त आहे.

Pope Leo XIV

जगातील प्रमुख शक्तींना ‘यापुढे युद्ध न करण्याचे’ आवाहन करत, कॅथोलिक चर्चचे प्रमुख आणि व्हॅटिकन सिटी स्टेटचे सार्वभौम पोप लिओ चौदावा यांनी रविवारी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे स्वागत केले. यासह दोन्ही देशांमधील वाटाघाटींमुळे कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होईल अशी आशा व्यक्त केली. रॉयटर्सने याबाबत वृत्त दिले आहे. पोप लिओ यांनी देवाने जगाला 'शांतीचा चमत्कार' द्यावा अशी प्रार्थना केली. 11 मे 2025 रोजी व्हॅटिकन येथील सेंट पीटर्स बॅसिलिकाच्या मध्यवर्ती बाल्कनीतून पोप लिओ चौदावा रेजिना यांनी प्रार्थनेचे नेतृत्व केले. यावेळी त्यांनी पोप म्हणून निवडून आल्यानंतर रविवारी दुपारी केलेल्या पहिल्या आवाहनात, युक्रेनमध्ये शांतता, युद्धबंदी आणि गाझामधील ओलिसांची सुटका करण्याचे आवाहन केले आहे. ‘पुन्हा कधीही युद्ध करू नका’, असे पोप म्हणाले.

तीन दिवसांहून अधिक काळ झालेल्या तीव्र गोळीबारानंतर, भारत आणि पाकिस्तानने शनिवारी जमीन, हवाई आणि समुद्रातील सर्व गोळीबार आणि लष्करी कारवाई तात्काळ थांबवण्याबाबत युद्धबंदी केली. यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्ती केल्याचे वृत्त आहे. आता  पोप लिओ चौदावा यांनी या युद्धबंदीवर भाष्य केले. शिकागोमध्ये जन्मलेले 69 पोप लिओ हे 267 वे पोप आहेत आणि अशी धार्मिक नेतृत्व पदवी धारण करणारे पहिले अमेरिकन आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त, नवीन पोप यांनी पोप फ्रान्सिसच्या शब्दांना अनुसरून आज जगाला ग्रासलेल्या अनेक संघर्षांचा निषेध केला. (हेही वाचा: Congress Demands Special Parliament Session: 'पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि युद्धबंदीच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन घ्यावे'; कॉंग्रेसची मागणी)

India-Pakistan Ceasefire:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement