India-Pakistan Conflict: भारत आणि पाकिस्तान युद्धबंदीवर सहमत; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
ट्रम्प यांनी दोन्ही राष्ट्रांनी सामान्य ज्ञान आणि उत्तम बुद्धिमत्ता दाखवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले असून वाढत्या लष्करी संघर्षानंतर शत्रुत्व थांबवण्याच्या आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.
India-Pakistan Agree On Ceasefire : भारत-अमेरिकेच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये दावा केला आहे की, 'अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रीच्या दीर्घ चर्चेनंतर, भारत आणि पाकिस्तान पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमत झाले आहेत.' ट्रम्प यांनी दोन्ही राष्ट्रांनी सामान्य ज्ञान आणि उत्तम बुद्धिमत्ता दाखवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले असून वाढत्या लष्करी संघर्षानंतर शत्रुत्व थांबवण्याच्या आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.
अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तान 'पूर्ण आणि तात्काळ' युद्धबंदीवर सहमत; ट्रम्प यांचा दावा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)