IMF Economic Prediction For India: जागतिक विकास दराबाबत IMF ने दिले मोठे विधान, म्हटले- भारत, चीन जगाच्या GDP मध्ये देणार निम्मे योगदान

आयएमएफच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी जागतिक अर्थव्यवस्थेबाबत इशारा देताना सांगितले की, रशिया-युक्रेन युद्धामुळे गेल्या वर्षी जागतिक अर्थव्यवस्थेला झटका बसला होता तो यावर्षीही कायम राहणार आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जागतिक आर्थिक विकास (IMF) दराबाबत मोठा अंदाज व्यक्त केला आहे. या वर्षी जागतिक अर्थव्यवस्था 3 टक्क्यांपेक्षा कमी दराने वाढेल, असे आयएमएफने म्हटले आहे. त्याचबरोबर या वाढीमध्ये भारत आणि चीनचा वाटा निम्मा असेल. आयएमएफच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी जागतिक अर्थव्यवस्थेबाबत इशारा देताना सांगितले की, रशिया-युक्रेन युद्धामुळे गेल्या वर्षी जागतिक अर्थव्यवस्थेला झटका बसला होता तो यावर्षीही कायम राहणार आहे. अशा परिस्थितीत 2023 मध्ये जगाचा जीडीपी 3 टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.