Heavy Rain in Spain Video: स्पेनच्या काही भागात मुसळधार पाऊस, रेल्वे सेवा बंद, लोकांना घरीच राहण्याचे दिले आदेश
स्पेन मध्ये पावसाने कहर केल्याची माहिती मिळाली आहे.मुसळधार पावसाने थैमान घातल्याने काही रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आले आहे.
Heavy Rain in Spain Video: स्पेन मध्ये मुसळधार पाऊस असल्याची माहिती मिळाली आहे. मुसळधार पावसाचा कहर माजल्यानंतर स्पेन मध्ये रेल्वे सेवा बंद करण्यात आले आहे. तसेच एक फुटबॉल सामान देखील वातावरण बिघडल्यामुळे बंद ठेवण्यात आले आहे. काही भागात तीव्र पावसाने जनजीवन विसकळीत केल्याची माहिती मिळाली आहे. हवामान विभागाने नागरिकांना घरीच राहण्याचे आदेश दिले आहे. रविवारी, माद्रिद आणि आसपासच्या भागात तीव्र पावसासाठी हवामानाचा इशारा देण्यात आला होता. स्पेनच्या राष्ट्रीय हवामान एजन्सी AEMET ने रेड अलर्ट जारी केला, ज्याचा अर्थ माद्रिद प्रदेश, टोलेडो प्रांत आणि कॅडीझ शहरात अतिवृष्टीचा धोका होता. माद्रिद आणि व्हॅलेन्सियाच्या पूर्व किनारपट्टी प्रदेश आणि इतर मार्गांदरम्यानची रेल्वे सेवा काही काळ बंद करण्यात आली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)