Greece Train Accident: ग्रीसमध्ये दोन ट्रेनची समोरासमोर धडक; 26 प्रवाशांचा मृत्यू
एका प्रवासी ट्रेनला मालगाडी ट्रेनने धडक देऊन झालेल्या अपघातात 26 जणांचा मृत्यू झाला असून 85 जण जखमी आहेत.
ग्रीसमध्ये (Greece) दोन ट्रेन समोरसमोर येऊन झालेल्या भीषण धडकेत (Train Accident) आतापर्यंत 26 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात 85 हून अधिक लोक जखमी झाले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काही जखमींची स्थिती ही गंभीर असल्याची माहिती आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. मंगळवारी रात्री उशिरा ग्रीसमधीस एथेंस शहरा 235 किमी अंतरावर एका प्रवासी ट्रेनला एका मालगाडी ट्रेनने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे ट्रेनचे काही डब्बे पटरीवरुन घसरले ज्यामधील तीन डब्ब्यांना आग देखील लागली.
पहा व्हिडीयो -
BREAKING: Two trains collide, catch fire in central Greece, multiple dead and injured
— Insider Paper (@TheInsiderPaper) February 28, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 01, 2023 08:48 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

