Earnings From ChatGPT: चॅट जीपीटीद्वारे 23 वर्षीय तरुणाने 3 महिन्यात कमावले 28 लाख रुपये, जाणून घ्या कसे
चॅटबॉट बाजारात आल्यानंतर बहुतेकांच्या मनात प्रश्न आला की या चॅटबॉटमुळे आपली नोकरी जाऊ शकते. आता बातमी आहे की, लान्स जंक नावाच्या 23 वर्षीय तरुणाने चॅट जीपीटीद्वारे 3 महिन्यांत 28 लाख रुपये कमावले आहेत.
ओपन एआयने गेल्या वर्षी चॅट जीपीटी लाँच केले. जे मोठे दिग्गज करू शकले नाहीत ते या चॅटबॉटने अवघ्या एका आठवड्यात करून दाखवले. हा चॅटबॉट आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित आहे. हा चॅटबॉट बाजारात आल्यानंतर बहुतेकांच्या मनात प्रश्न आला की या चॅटबॉटमुळे आपली नोकरी जाऊ शकते. आता बातमी आहे की, लान्स जंक नावाच्या 23 वर्षीय तरुणाने चॅट जीपीटीद्वारे 3 महिन्यांत 28 लाख रुपये कमावले आहेत. बिझनेस इनसाइडरच्या लान्स जंकने Udemy वर चॅटजीपीटी बाबत व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केला. या कोर्समध्ये त्याने चॅट जीपीटीच्या क्षमता आणि त्याचा वापर कसा करायचा याची माहिती दिली. या अभ्यासक्रमासाठी विविध ठिकाणांहून सुमारे 15000 जणांनी नोंदणी केली होती. लान्स जंक याने या कोर्सला 'चॅट जीपीटी मास्टर क्लास फॉर बिगिनर्स' असे नाव दिले. या कोर्समुळे लान्स जंकने 3 महिन्यांत सुमारे 28 लाख रुपये कमावले.