Queen Elizabeth II Death: ब्रिटनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर बकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर दुहेरी इंद्रधनुष्य, सोशल मिडीयावर फोटोची जोरदार चर्चा

दरम्यान बकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर दुहेरी इंद्रधनुष्याचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

Queen Elizabeth II | (Photo Credit: ANI)

ब्रिटनच्या (Britain) महाराणी क्वीन एलिझाबेथ  (Queen Elizabeth II) यांचं काल रात्री वृद्धपकाळानं निधन झालं. वयाच्या 96 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय.  स्कॉटलंडमधील बाल्मोरल (Balmoral) कॅसल या ठिकाणी त्यांनी अंतिम श्वास घेतला. राणीच्या निधनाची बातमी ऐकताच बकिंगहॅम पॅलेसच्या (Buckingham Palace) बाहेरी मोठी गर्दी बघायला मिळाली. दरम्यान बकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर दुहेरी इंद्रधनुष्याचा फोटो सोशल मिडीयावर (social media) व्हायरल (viral) होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)