Donald Trump यांचं X वर 'कमबॅक'; Elon Musk सोबतच्या मुलाखतीपूर्वीचा व्हिडिओ प्रचाराचा भाग म्हणून पोस्ट

डोनाल्ड ट्रम्प यांनी यूएस अध्यक्षीय निवडणूक 2024 साठी मुलाखतीचा एक व्हीडीओ प्रचाराचा भाग म्हणून पोस्ट करून X वर पुनरागमन केले आहे. डोनाल्ड ट्रम्पची X पोस्ट एलोन मस्क यांच्या मुलाखतीचा एक छोटासा भाग आहे.

Donald Trump | (Photo Credits: Facebook)

यूएस अध्यक्षीय निवडणूक 2024 साठी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांनी जोरदार तयारी केली आहे. नुकतच एक्सकडून त्यांच्यावरील बॅन हटवण्यात आलं. त्यानंतर प्रचाराचा भाग म्हणून एक नवीन व्हिडिओ त्यांनी X वर पोस्ट केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची X पोस्ट एलोन मस्क(Elon Musk) यांच्या मुलाखती पूर्वीच्या व्हिडीओची आहे. ज्यात ते 'मी राष्ट्राध्यक्ष असतानाची की आत्तांची तुमची स्थिती चांगली आहे? आमची अर्थव्यवस्था ढासळली आहे. आम्ही एक अधोगती असलेले राष्ट्र आहोत. अमेरिकेला पुन्हा सुरक्षित करा. अमेरिकेला पुन्हा मोठ बनवा,' असे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क मंगळवारी X सोशल मीडिया नेटवर्कवर रिपब्लिकन अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची मुलाखत घेणार आहेत. त्या आधी व्हिडीओची जाहीरात प्रचाराचा भाग म्हणून वापरण्यात आली आहे. (हेही वाचा : PM Modi Condemns Attack On Donald Trump: 'राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही', डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा पंतप्रधान मोदींकडून निषेध)

पोस्ट पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement