Donald Trump यांचं Elon Musk सोबत मुलाखतीच्या निमित्ताने 'X' वर पुन्हा आगामन; 'DDOS Attack'चा व्यत्यय
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाइव्हस्ट्रीममध्ये मोठ्या प्रमाणावर DDoS हल्ला झाला, ज्यामुळे X ला थेट प्रेक्षकांची संख्या कमी करण्यास भाग पाडले.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणूकीमधील उमेदवार डोनाल्ड ट्र्म्प यांचा आज X म्हणजे पूर्वीच्या ट्वीटर वर पुन्हा आगमन झालं. इलॉन मस्क सोबतच्या मुलाखतीच्या निमित्ताने त्यांनी पुन्हा X वर हजेरी लावली होती. पण त्यांच्या या मुलाखतीच्या निमित्ताने X वर ' He Is Back' ट्रेंड होताना दिसलं. तीन वर्षांपूर्वी एका बंडानंतर ट्र्म्प यांच्यावर ट्वीटर वर बंदी घालण्यात आली होती. इलॉन मस्क यांनी प्लॅटफॉर्म विकत घेतल्यानंतर, नोव्हेंबर 2022 मध्ये ट्रम्प यांना पुन्हा एंट्री दिली होती पण 2023 नंतर त्यांनी काहीच पोस्ट केले नव्हते. पण या मुलाखतीमध्येही व्यत्यय आले. इलॉन मस्कने जाहीर केले आहे की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाइव्हस्ट्रीममध्ये मोठ्या प्रमाणावर DDoS हल्ला झाला, ज्यामुळे X ला थेट प्रेक्षकांची संख्या कमी करण्यास भाग पाडले.
पहा पोस्ट
इथे ऐका मुलाखत
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)