Diwali Holiday In New York Schools: आता न्यूयॉर्कच्या शाळांना असेल अधिकृत दिवाळीची सुट्टी; अमेरिकन मुलेही साजरा करणार दिव्यांचा सण
अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, न्यूयॉर्क राज्य विधानमंडळाने भारतातील सर्वात मोठा सण दीपावलीच्या निमित्ताने सेलिब्रेशनसाठी राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली आहे.
अमेरिकेतील (US) हिंदू धर्मियांसाठी एक मोठी बातमी आहे. पेनसिल्व्हेनियानंतर अमेरिकेतील आणखी एका ठिकाणी दिवाळीची अधिकृतरीत्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासाठी एक विधेयक मंजूर करण्यात आले आहे. आता अमेरिकेतील सर्वात मोठे शहर न्यूयॉर्कमधील शाळांना दिवाळीच्या सुट्या असणार आहेत. अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, न्यूयॉर्क राज्य विधानमंडळाने भारतातील सर्वात मोठा सण दीपावलीच्या निमित्ताने सेलिब्रेशनसाठी अधिकृत सुट्टी जाहीर केली आहे. सुमारे 600,000 न्यूयॉर्कर्स दिवाळी साजरी करतात. पाच दिवसांचा हा सण हिंदू, जैन, शीख आणि काही बौद्ध लोकांद्वारेदेखील साजरा केला जातो. व्हाईट हाऊस आणि यूएस कॅपिटलसह राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये देखील दिवाळी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जात असली तरी, अद्याप इथे राष्ट्रीय सुट्टी घोषित केलेली नाही. (हेही वाचा: प्रसिद्ध झाली जगातील सर्वात लोकप्रिय रेस्टॉरंट्सची यादी; भारतातील 7 ठिकाणांचा समावेश, घ्या जाणून)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)