Copenhagen Stock Exchange Fire: कोपनहेगनच्या ऐतिहासिक स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीला भीषण आग, शिखर कोसळला; घटनास्थळी बचाव कार्य सुरु

डेन्मार्कच्या १७ शतकातील ऐतिहासिक स्टॉक एक्सचेंजला आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Borsen Stock Exchange Fire Videos: PC TWITTER

Copenhagen Stock Exchange Fire: डेन्मार्कच्या 17व्या शतकातील ऐतिहासिक स्टॉक एक्सचेंजला आग (Fire) लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इनसाइडर पेपरच्या वृत्तानुसार, कोपनहेगनमधील ऐतिहासिक बोर्सन स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीला आग  लागल्यामुळे लँडमार्क शिखर जळला आहे. शिखर जळल्याने जमिनीवर तुटून पडला आहे. या आगीच्या घटनेमुळे परिसरात धुरांचे लोट पसरले आहे. आगीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आगीपासून वाचण्यासाठी लोकांनी पळापळ सुरु केली आहे. आगीच्या घटनेमुळे लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. आग लागली तेव्हा इमारतीची नुतनीकरण चालू होते. इमारतीचा काही भाग जळून खाक झाला आहे. (हेही वाचा- जॉर्जियाच्या संसदेत विदेशी एजंट लॉ वर चर्चेदरम्यान खासदारांमध्ये हाणामारी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)