Brazil Shocker: लेकीच्या स्ट्रोलरला लाथ मारल्याच्या रागात एकाकडून विक्रेत्याची भर रस्त्यात हत्या; जुना व्हिडिओ व्हायरल
ब्राझीलमध्ये एका छोट्या घटनेत लेकीच्या स्ट्रॉलरला लाथ मारल्याच्या रागात एकाने रस्स्त्यावरील विक्रेत्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे. विक्रेत्यावर चाकूने वार करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
Brazil Shocker: 2023 चा ब्राझीलमधील धक्कादायक घटनेचा व्हिडीओ इंटरनेटवर पुन्हा व्हायरल झाला आहे. ही घटना घडली जेव्हा एका विक्रेत्याने वडील आणि त्याच्या मुलीच्या स्ट्रॉलरला लाथ मारली. मुलीला धमकावले आणि त्याच्याकडून खरेदी करण्यास नकार दिल्यावर चाकू काढला. स्वसंरक्षणार्थ आणि आपल्या मुलीचे रक्षण करण्यासाठी त्या व्यक्तीने चाकू ताब्यात घेतला आणि हल्लेखोराला ठार मारले. व्हिडिओ फुटेजमध्ये तो माणूस हल्लेखोरावर सार्वजनिक ठिकाणी अनेक वेळा चाकूने वार (Stabbing Video)करताना दिसत आहे. या कृत्यादरम्यान वडिलांच्या डाव्या हाताला जखम झाली. (हेही वाचा: US Mass Shooting: मिसिसीपी येथील नाईट क्लब परिसरात गोळीबार, 3 जण ठार)
व्हिडीओ पहा
Un padre estaba con su pequeña hija se le acercó un vendedor que pateó el cochecito, amenazó a la niña y sacó un cuchillo por no quererles comprar. El padre, en defensa propia y de la niña, logró tomar el cuchillo y mató al criminal en Brasil 🇧🇷. ¿Apoyas al padre que se defendió? pic.twitter.com/MzaJEPOUPX
— Eduardo Menoni (@eduardomenoni) July 19, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 22, 2024 03:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

