Bangkok Earthquake Videos: बॅंकॉक मध्ये भूकंपाच्या धक्क्यात रूफ टॉप स्विमिंग पुल चे झाले धबधबे, ट्रेन देखील हादरल्या (Watch Viral Clips)
बॅकॉंक मध्ये सध्या इमरजंसी जाहीर करण्यात आली आहे.
म्यानमार मध्ये 7.7 रिश्टल स्केल इतका शक्तीशाली भूकंपाने थायलंड देशाची राजधानी बॅंकॉक देखील हादरली. या भीषण भूकंपाच्या वेळी अचानक सारंच हादरल्याने नगारिकांची धावपळ झाली. सोशल मीडीयामध्ये बॅकॉंक मध्ये भूकंपाच्या वेळेस नेमकं काय झालं? याचे व्हिडिओज आता समोर येत आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी रूफ टॉप स्विमिंग पूल मधील पाणी धबधब्यासारखं खाली कोसळताना दिसत आहे तर एका ठिकाणी निर्माणाधीन इमारत कोसळल्याचं अनेकांनी कॅमेर्यात टिपलं आहे. बॅकॉंक मध्ये प्लॅटफॉर्म वर ट्रेन देखील गदागदा हलत असल्याचं एका फूटेज मध्ये दिसत आहे.
बॅकॉंक मध्ये भूकंपाच्या वेळेस काय झालं?
ट्रेन हादरली
निर्माणाधीन इमारत कोसळली
रूफ टॉप वरील स्विमिंग पूलचे पाणी धबधब्याप्रमाणे खाली