Attack on Pakistan Military Post: पाकिस्तानी लष्करी चौकीवर हल्ला, सुरक्षा दलाचे 5 जवान ठार

दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेले वाहन पोस्टमध्ये घुसवले, त्यानंतर अनेक आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणले, ज्यामुळे इमारतीचा काही भाग कोसळला, परिणामी पाच जण ठार झाले, असे असे निवेदनात म्हटले आहे.

Encounter प्रतिकात्मक प्रतिमा | (Photo Credits: Pixabay)

Attack on Pakistan Military Post: दहशतवाद्यांनी शनिवारी वायव्य पाकिस्तानमधील लष्करी चौकीवर हल्ला केला. यात सुरक्षा दलाचे पाच सदस्य ठार झाले. हा हल्ला सहा हल्लेखोरांच्या गटाने घडवून आणला होता, असा खुलासा लष्कराच्या मीडिया शाखेने एका निवेदनाद्वारे केला आहे. तथापि, या हल्ल्यामागील विशिष्ट दहशतवादी गटाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेले वाहन पोस्टमध्ये घुसवले, त्यानंतर अनेक आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणले, ज्यामुळे इमारतीचा काही भाग कोसळला, परिणामी पाच जण ठार झाले, असे असे निवेदनात म्हटले आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या वझिरीस्तानमधील रहिवाशांनी रॉयटर्सला सांगितले की हल्ला सुरू झाला तेव्हा स्फोटाने दरवाजे आणि खिडक्या फुटल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)