Bangladesh Air Force Base Attacked: बांगलादेश मधील कॉक्स बाजार येथे हवाई दलाच्या तळावर हल्ला; 1 जण ठार, अनेक जखमी (Watch Video)

बांगलादेशच्या कॉक्स बाजार येथील हवाई दलाच्या तळावर सोमवारी अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्यात 1 जण ठार झाला आहे.

Photo Credit-X

Bangladesh Air Force Base Attacked: बांगलादेशच्या कॉक्स बाजार (Coxs Bazar) येथील हवाई दलाच्या तळावर सोमवारी 24 फेब्रुवारी रोजी हल्ला (Bangladesh Air force) झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात एक जण ठार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय स्थानिक व्यापारी शिहाब कबीर याला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. बांगलादेश सशस्त्र दलाच्या जनसंपर्क विभाग, इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने एका संक्षिप्त निवेदनात, समिती पारा परिसरातील तळावर झालेल्या हल्ल्याची माहिती दिली. (UAE Expands Visa-On-Arrival Facility: भारतीय प्रवाशांसाठी खूषखबर; यूएई मध्ये व्हिसा ऑन अरायव्हलच्या नियमात झाले नवे बदल)

बांगलादेश मधील कॉक्स बाजार येथे हवाई दलाच्या तळावर हल्ला

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now