Volcanic Eruption in Indonesia: इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक; हवेत दृश्यमानता खालावल्याने एअर इंडिया, इंडिगोची बालीला जाणारी उड्डाणे रद्द

स्फोटामुळे एक किलोमीटरपर्यंत राख पसरली गेली. दृश्यमानता खालावल्यामुळे एअर इंडिया, इंडिगोची बालीला जाणारी उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

Photo Credit- X

Volcanic Eruption in Indonesia: इंडोनेशियातील जावा येथे सेमेरू ज्वालामुखीचा सोमवारी पहाटे 03.35 वाजता उद्रेक झाला. स्फोटामुळे एक किलोमीटरपर्यंत राख पसरली गेली. हवेतील दृश्यमानता खालावल्यामुळे एअर इंडिया(Air India), इंडिगोची (Indigo) बालीला जाणारी उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. एअर इंडियाने ट्रॅव्हल ॲडव्हायझरी जारी करून स्पष्ट केले की, दिल्ली ते बाली AI 2145 आणि AI 2146 या विमानांवर प्रतिकूल हवामानाचा परिणाम झाला आहे. एअरलाइनने प्रवाशांना आश्वासन दिले की ती गैरसोय कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. इंडिगोनेही राखेच्या ढगांमुळे होणाऱ्या संभाव्य व्यत्ययाचे कारण देत आपली उड्डाणे रद्द केली. पूर्व नुसा टेंगारा येथे गेल्या आठवड्यात झालेल्या माउंट लेवोटोबी लाकी लाकीच्या उद्रेकामुळे या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर उड्डाण रद्द करण्यात आले आहे.

हवेत दृश्यमानता खालावल्याने एअर इंडिया, इंडिगोची बालीला जाणारी उड्डाणे रद्द