Afghanistan Blast: काबूलच्या परराष्ट्र मंत्रालयाजवळ भीषण स्फोट; 6 ठार - अनेक जखमी

तपास यंत्रणांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट अत्यंत भीषण होता.

Pakistan Suicide Blast. (Photo Credits: Twitter@AnasMallick)

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये मोठा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काबुलमधील परराष्ट्र मंत्रालय रोडवरील दौदझाई ट्रेड सेंटरजवळ हा स्फोट झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. तपास यंत्रणांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट अत्यंत भीषण होता. ज्या भागात स्फोट झाला त्या भागात अनेक सरकारी इमारती आणि दूतावास आहेत. आतापर्यंत या बॉम्बस्फोटाची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement