China Fire Video: चीनमधील हेनान प्रांतातील कारखान्याला भीषण आग, अपघातात 36 जणांचा मृत्यू (Watch Video)

या घटनेत अन्य दोन जण जखमी झाले असून दोन जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार सोमवारी दुपारी चारच्या सुमारास आग लागली.

मंगळवारी सकाळी चीनमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मध्य चीनमधील हेनान प्रांतातील एका कारखान्यात आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात सुमारे 36 जणांचा मृत्यू झाला. एनयांग शहरातील कारखान्यात (China Work Shop Fire) ही घटना घडली. या घटनेत अन्य दोन जण जखमी झाले असून दोन जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार सोमवारी दुपारी चारच्या सुमारास आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना अनेक तास मेहनत घ्यावी लागली. 200 हून अधिक बचाव कर्मचारी आणि सुमारे 60 अग्निशमन दल आग विझवण्याच्या प्रयत्नात गुंतले होते. या घटनेनंतर परिसरात काही तास गोंधळ उडाला.

पहा व्हिडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement