Earthquake in Tokyo: जपानच्या टोकियो शहरात 4.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; कानागावा आणि चिबा प्रीफेक्चरमध्येही जाणवले हादरे

जपानच्या टोकियो शहरात बुधवारी पहाटे 4.7 तीव्रतेच्या भूकंपाने धक्के जानवले. स्थानिक वेळेनुसार पहाटे 01:47 वाजता हा भूकंप झाला. टोकियो, कानागावा आणि चिबा प्रीफेक्चरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.

Earthquake

Earthquake in Tokyo: जपानच्या टोकियो शहरात बुधवारी पहाटे 4.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के(Earthquake in Tokyo) जानवले. जपानच्या हवामान संस्थेने त्याबाबतची माहिती दिली. स्थानिक वेळेनुसार पहाटे 01:47 वाजता हा भूकंप झाला. टोकियो, कानागावा आणि चिबा प्रीफेक्चरमध्येही भूकंपाचे धक्के( Tremor) जाणवले. 120 किमी खोलीवर, भूकंपाचे केंद्र टोकियोच्या 23 वॉर्डमध्ये 35.7 अंश उत्तर अक्षांश आणि 139.6 अंश पूर्व रेखांशावर होते. दरम्यान, त्सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. भूकंपामुळे कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

पोस्ट पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement