Cambodia Hotel Fire: कंबोडियातील हॉटेलला लागलेल्या आगीत 10 जणांचा मृत्यू, जीव वाचवण्यासाठी लोकांनी पाचव्या मजल्यावरून मारली उडी
या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे.
Cambodia Hotel Fire: कंबोडियातील एका हॉटेलला भीषण आग लागल्याचे वृत्त समोर आले आहे. थायलंडच्या सीमेजवळ कंबोडियाच्या पोइपेटच्या ग्रँड डायमंड सिटीमध्ये असलेल्या या हॉटेल आणि कॅसिनोमध्ये आग इतकी वेगाने पसरली की, अनेकांना बाहेर पडता आले नाही. या आगीत अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे.
लोकांनी पाचव्या मजल्यावरून उडी मारली -
पोईपेट येथील ग्रँड डायमंड सिटी हॉटेलला लागलेल्या आगीमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. ऑनलाइन व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आग इतकी पसरली होती की लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी जळत्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)