Tahawwur Rana Extradition Cleared: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाकडून Tahawwur Hussain Rana च्या भारतात प्रत्यार्पणाला मंजुरी

भारतासाठी तहव्वूरचं प्रत्यार्पण हा मोठा विजय आहे. तहव्वूर राणा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक आहे.

Tahawwur Rana | (Photo Credits: X/@PoornimaNimo)

मुंबई मध्ये झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यामधील मास्टरमाईंडपैकी एक तहव्वूर हुसेन राणा याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी देत प्रक्रिया पूर्ण केली आहे. भारतासाठी तहव्वूरचं प्रत्यार्पण हा मोठा विजय आहे. मुंबईत रेकी केल्याचा आरोप राणा वर आहे. राणा हा पाकिस्तानी वंशाच्या कॅनेडियन नागरिक आहे. त्याला भारताने फरार घोषित केले आहे आणि सहा अमेरिकन नागरिकांसह 166 लोक ठार झालेल्या हल्ल्यांशी संबंधित अनेक गुन्ह्यांचाही त्याच्यावर आरोप आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement