Vikram Lander चं चंद्रावर पुन्हा सॉफ्ट लॅन्डिंग; 'Hop Experiment' कामगिरीची ISRO ने दिली माहिती
चंद्रावर आज विक्रम लॅन्डरने लहानशी उडी मारली आणि पुन्हा सुस्थितीत स्वतःला अॅक्टिव्ह ठेवलं आहे. त्यामुळे त्याचा हा 'HOP Experiment' यशस्वी झाल्याची माहिती इस्त्रो ने दिली आहे.
चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरण्याची कामगिरी केल्यानंतर आता विक्रम लॅन्डरची 'Hop Experiment' मधील कामगिरी देखील चमकदार राहिली आहे. चंद्रावर Vikram Lander पुन्हा एकदा सॉफ्ट लॅन्डिंग करण्यात यशस्वी ठरला आहे. यामध्ये लॅन्डरने 30-40 सेमी दूर एक लहानशी उडी मारली आहे. यासाठी तो 40 सेमी वर गेला होता. या नंतरही विक्रम लॅन्डर सुस्थितीमध्ये आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)