NASA Transmits Hip-Hop Song To Venus: नासाने रचला इतिहास! अवकाशात गुंजले हिप-हॉपचे बोल; प्रकाशाच्या वेगाने शुक्रावर प्रसारित केले Missy Elliott चे गाणे

गाण्याचे प्रसारण करून, नासा शुक्राकडून डेटा प्राप्त करण्यासाठी लागणारी पद्धत आणि वेळ यावर प्रयोग करत आहे.

NASA Transmits Hip-Hop Song To Venus

NASA Transmits Hip-Hop Song To Venus: नासाने रचला इतिहास! अवकाशात गुंजले हिप-हॉपचे बोल; प्रकाशाच्या वेगाने शुक्रावर प्रसारित केले Missy Elliott चे गाणे अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने पुन्हा एकदा अंतराळात एक नवा इतिहास रचला आहे. नासाने हिप-हॉप कलाकार मिसी इलियटच्या ‘द रेन (सुपा डुपा फ्लाय)’ या गाण्याचे बोल आपल्या डीप स्पेस नेटवर्क (DSN) द्वारे शुक्र ग्रहावर पाठवले आहेत. या गाण्याने त्याच्या प्रसारणादरम्यान पृथ्वीपासून शुक्रापर्यंतचा अंदाजे 254 दशलक्ष किलोमीटरचा प्रवास केला आहे. प्रकाशाच्या वेगाने प्रसारित झालेल्या, या रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नलला ग्रहापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 14 मिनिटे लागली. नासाने अंतराळात हिप-हॉप गाणे पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2008 मध्ये 'एक्रोस द युनिव्हर्स' नावाचे दुसरे गाणे अंतराळात प्रसारित झाले होते, जे इंग्रजी रॉक बँड 'द बीटल्स'ने रेकॉर्ड केले होते.

गाण्याचे प्रसारण करून, नासा शुक्राकडून डेटा प्राप्त करण्यासाठी लागणारी पद्धत आणि वेळ यावर प्रयोग करत आहे. डीएसएनचा वापर करून, भविष्यातील मोहिमांमध्ये पृथ्वीवरील महत्त्वाचे संदेश शुक्राला पाठवले जाऊ शकतात आणि शुक्राचे महत्त्वाचे संदेश पृथ्वीवर मिळू शकतात. शुक्र हा सूर्यमालिकेतील सहावा ग्रह आहे. (हेही वाचा: Wrong UPI Payment: युपीआयद्वारे चुकीच्या खात्यात पैसे गेले तर घाबरू नका; त्वरित करा 'हे' काम, प्राप्त होईल संपूर्ण रक्कम, NCIB ने दिली माहिती)

पहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by NASA (@nasa)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)