OpenAI SearchGPT: ओपनएआयने लाँच केले सर्च इंजिन 'सर्च जीपीटी'; Goggle शी करणार स्पर्धा
ओपनएआयने आपल्या सर्च जीपीटीबद्दल दावा केला आहे की, ते कोणत्याही विद्यमान शोध इंजिनपेक्षा वेगवान असेल आणि वास्तविक वेळेत वापरकर्त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देईल.
OpenAI SearchGPT: सर्च इंजिन विश्वातील गुगलची मक्तेदारी लवकरच संपण्याची चिन्हे आहेत. नुकतेच ओपन एआयने (OpenAI) आपले बहुप्रतीक्षित सर्च इंजिन लाँच केले आहे. ओपन एआयच्या सर्च इंजिनला सर्च जीपीटी (SearchGPT) असे नाव देण्यात आले असून, यामुळे गुगलला मोठी टक्कर मिळणार आहे. सर्च जीपीटीला आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा सपोर्ट आहे. सर्च जीपीटी सध्या वेबवर सुरू करण्यात आले असून, ॲपच्या आवृत्तीबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
ओपनएआयने आपल्या सर्च जीपीटीबद्दल दावा केला आहे की, ते कोणत्याही विद्यमान शोध इंजिनपेक्षा वेगवान असेल आणि वास्तविक वेळेत वापरकर्त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देईल. ओपनएआय सध्या फक्त सर्च जीपीटीची चाचणी करत आहे. यासाठी कंपनीने 10,000 लोकांचा ग्रुप तयार केला आहे. भविष्यात लवकरच इतर युजर्ससाठीही सर्चजीपीटी सादर होण्याची अपेक्षा आहे. (हेही वाचा: Telegram EvilVideo Malware Alert: टेलिग्रामवरून चित्रपट-व्हिडिओ डाउनलोड करणे पडू शकते महागात; मोबाईलमध्ये प्रवेश करू शकते 'इव्हलव्हिडिओ' मालवेअर, हॅकर्सपासून रक्षण करण्यासाठी काही टिप्स)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)