भारतात Online Transaction मध्ये वाढ, 2030 पर्यंत देशात ऑनलाईन व्यवहारांची संख्या 700 दशलक्षांपर्यंत पोहचण्याची शक्यता
भारतात सध्या ईकॉमर्स, शॉपिंग, ट्रॅव्हल आणि हॉस्पिटॅलिटी आणि ओटीटीमध्ये सुमारे 350 दशलक्ष ऑनलाइन व्यवहार करणारे वापरकर्ते आहेत आणि 2030 पर्यंत ही संख्या दुप्पट होईल, असे एका नवीन अहवालात दिसून आले आहे. म्हणजेच 2030 पर्यंत ही आकडेवारी तब्बल 700 दशलक्षांपर्यंतचा टप्पा गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इंटरनेटक्रांती झाल्याने अवघे देश हाताच्या बोटांवर आले. परिणामी जग एक खेडं बनल्याचा अनुभव आपल्यासह अनेक भारतीय घेत आहेत. त्याचाच परिणाम देशातील ऑनलाईन व्यवहारांमध्ये वाड होण्यात होत आहे. आयएनएसने एका अहवालाच्या हावाल्याने केलेल्या ट्विटमध्ये काही आकडेवारी दिली आहे. या आकडेवारीनुसार, भारतात सध्या ईकॉमर्स, शॉपिंग, ट्रॅव्हल आणि हॉस्पिटॅलिटी आणि ओटीटीमध्ये सुमारे 350 दशलक्ष ऑनलाइन व्यवहार करणारे वापरकर्ते आहेत आणि 2030 पर्यंत ही संख्या दुप्पट होईल, असे एका नवीन अहवालात दिसून आले आहे. म्हणजेच 2030 पर्यंत ही आकडेवारी तब्बल 700 दशलक्षांपर्यंतचा टप्पा गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)