One More Blow To Canadian Singer Shubh: शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म Moj ने काढून टाकली कॅनेडियन गायक शुभची सर्व गाणी
गेल्या अनेक दिवसांपासून शुभच्या भारत भेटीला विरोध होत होता. शुभला त्याच्या जुन्या भारतविरोधी पोस्टसाठी भारतात एवढ्या विरोधाला सामोरे जावे लागले.
भारतविरोधी कारवायांसाठी खलिस्तानी दहशतवाद्यांना आपल्या भूमीवर आश्रय देणाऱ्या कॅनडासोबत भारताच्या सुरू असलेल्या वादाचा परिणाम आता दिसू लागला आहे. नुकतेच कॅनेडियन गायक आणि रॅपर शुभ उर्फ शुभनीत सिंगचा आगामी भारत दौरा रद्द करण्यात आला आहे. तसेच स्पीकर कंपनी बोटने शुभचे आपले प्रायोजकत्व रद्द केले आहे. त्यानंतर आता माहिती मिळत आहे की, शेअरचॅट (ShareChat) च्या मालकीच्या मोजने (Moj) आपल्या संगीत लायब्ररीतून कॅनेडियन गायक शुभची गाणी काढून टाकली आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून शुभच्या भारत भेटीला विरोध होत होता. शुभला त्याच्या जुन्या भारतविरोधी पोस्टसाठी भारतात एवढ्या विरोधाला सामोरे जावे लागले. शुभने खलिस्तानींना पाठिंबा देणारा भारताचा विकृत नकाशा शेअर केला होता. या नकाशात जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारत भारताच्या नकाशात दाखवण्यात आलेला नव्हता. (हेही वाचा: Shubh's India Tour Cancelled: भारतीय कॅनेडीयन गायक 'शुभ' चा भारत दौरा रद्द; Book My Show रिफंड करणार तिकीटाचे पैसे)