MyGate Layoffs: मायगेट कंपनीने केली 30 टक्के कर्मचारी कपात

सध्या भारतीय स्टार्ट अपस्मध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली जात असून ओयो, मिशो, उडान, आणि वेदांतू सारख्या स्टार्टअपने मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे.

layoff Pixabay

कम्युनिटी आणि सिक्युरिटी मॅनेजमेंट स्टार्टअप MyGate ने आपल्या 30% कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले आहे. बेंगळुरूस्थित स्टार्टअपने (Start ups) गेल्या पंधरा दिवसात मध्यम आणि कनिष्ठ श्रेणीतील कामगारांना काढून टाकले (Layoffs) आहे. 600 कर्मचार्‍यांच्या टीमची संख्या 400 पर्यंत खाली आली आहे. कामावरून काढून टाकलेल्या कर्मचार्‍यांना दोन महिन्यांचा पगार ऑफर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)