Meta Paid Blue Badge Service: आता Facebook आणि Instagram ब्लू टिकसाठी दरमहा द्यावे लागतील पैसे; ट्विटरनंतर मेटाने सुरू केली सशुल्क सेवा

त्यांनी सांगितले की, या आठवड्यात ही सेवा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये प्रथमच सुरू होणार आहे.

Mark Zuckerberg (Photo Credits-Twitter)

ट्विटरप्रमाणेच आता फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या मूळ कंपनी मेटानेही प्रीमियम व्हेरिफिकेशन सेवेची घोषणा केली आहे. म्हणजेच आता फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हेरिफाईड अकाऊंट म्हणजेच ब्लू टिकसाठी पैसे द्यावे लागतील. वेबसाठी त्याची किंमत $11.99 (रु. 993) आणि iOS साठी $14.99 (रु. 1241) सेट केली आहे.

कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याबाबतची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, या आठवड्यात ही सेवा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये प्रथमच सुरू होणार आहे. लवकरच ही सेवा इतर देशांमध्ये सुरू होणार आहे. वापरकर्ते त्यांच्या सरकारी ओळखपत्राद्वारे त्यांचे खाते सत्यापित करण्यास सक्षम असतील. या बदल्यात वापरकर्त्याच्या खात्याला अतिरिक्त सुरक्षा देखील दिली जाईल. मात्र, भारतात ही सेवा कधी सुरू होणार त्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)