Death Of 9-to-5 Jobs By 2034: इतिहासात जमा होतील 9 ते 5 नोकऱ्या, 2034 पर्यंत AI मुळे अनेक गोष्टी बदलतील; LinkedIn सह-संस्थापक Reid Hoffman यांची भविष्यवाणी
रीड हॉफमन यांचा विश्वास आहे की, एआय आणि ऑटोमेशनचा पुढील तीन दशकांमध्ये कर्मचाऱ्यांवर सर्वाधिक परिणाम होईल. याचा परिणाम असा होईल की 9-5 नोकऱ्या गायब होतील.
Death Of 9-to-5 Jobs By 2034: एआय लाँच झाल्यामुळे काम करण्याच्या संस्कृतीत बरेच बदल होऊ लागले आहेत. आता लिंक्डइनचे सह-संस्थापक रीड हॉफमन म्हणाले की, आर्टिफिशियल इंटेलिजेंस चालित कर्मचारी वर्ग अतिशय गतिमान पद्धतीने बदल घडवून आणत आहे, ज्यामुळे 9-5 नोकऱ्यांवरही परिणाम होईल. साधारण 2034 पर्यंत, 9 ते 5 अशी नोकरी भूतकाळातील गोष्ट होईल. ते पुढे म्हणाले की, एआय मानवी जीवन सुलभ करेल मात्र वर्कफोर्स त्याची जागा घेऊ शकणार नाही.
रीड हॉफमन यांचा विश्वास आहे की, एआय आणि ऑटोमेशनचा पुढील तीन दशकांमध्ये कर्मचाऱ्यांवर सर्वाधिक परिणाम होईल. याचा परिणाम असा होईल की 9-5 नोकऱ्या गायब होतील. हॉफमन एका चर्चासत्रात बोलत होते. ते म्हणाले की सॉफ्टवेअर आणि रोबोट्ससह एआय इतक्या प्रगत टप्प्यावर आहे की, ते मानवी संभाषणे ऐकू शकते आणि माणसाप्रमाणे प्रतिसाद देऊ शकते. हे अद्भुत आहे. हा एक अतिशय रोमांचक विकास आहे, कारण मानव आणि एआय रोबोट यांच्यातील हे कनेक्शन एकाकीपणा दूर करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. ते म्हणाले की, कंपन्यांचा मोठा भाग आता त्यांच्या दैनंदिन कामकाजात एआयचा समावेश करत आहे. एआय तंत्र, मशीन लर्निंग, डेटा ॲनालिटिक्स आणि ऑटोमेशन हे काम अधिक अचूक आणि जलद करण्यास सक्षम आहेत. याद्वारे कर्मचारी आपला वेळ सर्जनशीलतेसाठी वापरू शकतो. (हेही वाचा : OpenAI SearchGPT: ओपनएआयने लाँच केले सर्च इंजिन 'सर्च जीपीटी'; Goggle शी करणार स्पर्धा)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)