Apple Watch च्या Crash Detection Feature मुळे 3 जणांना मिळालं जीवनदान; 20 मीटर खोल दरीतून आले बाहेर
जर्मनीत एका 20 मीटर खोल दरीत कोसळलेल्या गाडीतील 3 जणांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. अपघात झालेल्या व्यक्तीच्या हातातील अॅप्पल वॉचमुळे त्यांचे प्राण वाचले
अॅप्पल वॉचच्या सीरीज 8 (apple watch series 8 ) मध्ये असलेल्या क्रेश डिटेक्शन फीचरमुळे (crash detection feature) जर्मनीत (Germany) एका 20 मीटर खोल दरीत कोसळलेल्या गाडीतील 3 जणांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गाडीचा हायवेवरुन जाताना हा अपघात झाला आणि तिघेही गाडीत अडकले होते. पंरतू या अपघाताचे कोणीही साक्षीदार नव्हते. अॅप्पल वॉचच्या सीरीज 8 ने स्वंयचलितपणे दुर्घटनेची माहिती अपघात झालेल्या व्यक्तीच्या परिजनांना दिली. त्यानंतर पोलीस दल आणि बचाव दल घटनास्थळी दाखल झाले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)