IPL Auction 2025 Live

Amazon Prime Layoffs: अॅमेझॉनने केली नोकर कपातीची घोषणा; प्राइम व्हिडिओ आणि एमजीएम स्टुडिओ व्यवसायातील शेकडो लोकांना काढून टाकणार

कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी आपल्या प्राइम व्हिडिओ (Prime Video) आणि एमजीएम स्टुडिओ व्यवसायातील शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे.

Amazon (PC - Pixabay)

Amazon Prime Layoffs: ई-कॉमर्स कंपनी Amazon पुन्हा एकदा आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी आपल्या प्राइम व्हिडिओ (Prime Video) आणि एमजीएम स्टुडिओ व्यवसायातील शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. कंपनीचे मनोरंजन प्रमुख माईक हॉपकिन्स यांनी बुधवारी कर्मचार्‍यांना पाठविलेल्या ईमेलमध्ये टाळेबंदीची घोषणा केली. त्यांनी आपल्या ईमेल संदेशात लिहिले की, हा खूप कठीण निर्णय आहे. माईक हॉपकिन्स यांनी ईमेल संदेशात पुढे सांगितले की आम्ही आमची गुंतवणूक वाढवताना काही क्षेत्रांमध्ये गुंतवणूक कमी किंवा बंद करण्याच्या विचारात आहोत.

त्यांनी पुढे लिहिले की, ‘ज्यांनी आमचे ग्राहक, संघ आणि व्यवसायासाठी अर्थपूर्ण योगदान दिले आहे अशा प्रतिभावान अॅमेझॉन कर्मचाऱ्यांना निरोप देणे कठीण आहे. तुमच्या समर्पण आणि कामाबद्दल कंपनी तुमची आभारी आहे.’ अॅमेझॉनच्या लाइव्ह गेम स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म ट्विचनेही पहिल्या टाळेबंदीची घोषणा केली आहे. ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, कंपनी या आठवड्यात 35 टक्के कर्मचारी किंवा सुमारे 500 कर्मचारी काढून टाकत आहे. (हेही वाचा: Meta's Big Action in India: भारतामध्ये मेटाची मोठी कारवाई; नोव्हेंबर 2023 मध्ये Facebook, Instagram वरील 23 दशलक्षाहून अधिक खराब कंटेंट काढून टाकला)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)