37th National Games 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी गोव्यात करणार राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन, देशभरातील खेळाडू आपली प्रतिभा करणार सादर

या कार्यक्रमाला पाच हजार विद्यार्थ्यांसह सुमारे बारा हजार लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 26 ऑक्टोबर रोजी दक्षिण गोव्यातील (Goa) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर 37 व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन (37th National Games 2023) करणार आहेत. या कार्यक्रमाला पाच हजार विद्यार्थ्यांसह सुमारे बारा हजार लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. 19 ऑक्टोबर रोजी गोव्यात 'बॅडमिंटन स्पर्धे'ने खेळांची सुरुवात झाली, जरी राष्ट्रीय खेळांचे औपचारिक उद्घाटन गुरुवारी होणार आहे. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर, पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि गोव्याचे क्रीडा मंत्री गोविंद गौडे हेही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय स्टेडियममध्ये जवळपास 600 कलाकार राष्ट्रीय एकात्मतेचे कार्यक्रम सादर करतील. राष्ट्रीय खेळांदरम्यान मल्लखांब, कलरीपयट्टू, गटका, लगोरी आणि योग या पाच देशी खेळांसह सुमारे 43 क्रीडा शाखांचे प्रदर्शन केले जाईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)