Paris Olympics 2024: भारतीय महिला टेबल टेनिस संघाचा रोमानियावर विजय, उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश; मनिका बत्राचीही चमकदार कामगिरी
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या महिला टेबल टेनिस संघाने चौथ्या मानांकित रोमानिया संघाचा पराभव केला आहे. भारतीय महिला संघाने दमदार खेळ सादर करत आपला दबदबा ठेवला आहे.
Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सोमवारी (5 ऑगस्ट) भारतीय महिला टेबल टेनिसने चौथ्या मानांकित रोमानियाचा 3-2 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश ( India Women Table Tennis Team into Quarterfinals)केला. ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला संघाचा हा पहिलाच सहभाग आहे. श्रीजा अकुला, अर्चना कामथ आणि मनिका बत्रा यांच्या भारतीय संघाने दुहेरी आणि एकेरीमध्ये विजय मिळवून 2-0 ने अंतिम रेषेपर्यंत मजल मारली. त्यामुळे उद्या ६ ऑगस्ट रोजी युनायटेड स्टेट्स विरुद्ध जर्मनी सामन्यातील विजेत्याशी भारतीय महिला संघाचा सामना होईल. मनिका बत्रा यांच्या अनुभवाचा वापर करत भारतीय संघाने विजय आपल्या नावावर नोंदवला. टायच्या पहिल्या सामन्यात श्रीजा अकुला आणि अर्चना गिरीश कामथ यांनी अदिना डायकोनू-एलिझाबेटा समारा जोडीवर 11-9, 12-10, 11-7 अशी मात केली. दुसऱ्या लढतीत महिला एकेरीच्या लढतीत मनिका बत्राने(Manika Batra) दहाव्या मानांकित बर्नाडेट स्झोक्सचा 11-5,11-7,11-7 असा पराभव केला.
पोस्ट पहा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)