PM Modi Congartulate Sachin Khilari: शॉट पूट F46 स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या सचिन खिलारीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतूकाचा वर्षाव

पॅरालिम्पिक 2024मध्ये गोळाफेक प्रकारात सचिन खिलारी याने 16.32 मीटरच्या उत्कृष्ट थ्रोसह रौप्यपदक पटकावले. सचिन खिलारी याच्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून त्याचे कौतूक करण्यात आले आहे.

PM Modi (Photo Credit - ANI)

PM Modi Congartulate Sachin Khilari: पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये आज 4 सप्टेंबरच्या दिवसाची सुरूवात मराठमोळ्या सचिन खिल्लारी (Sachin Khilari) याने शॉट पूट F46 प्रकारात रौप्य पदक (Silver Medal in Shot Put )जिंकत केली. सचिन खिलारी याने 16.32 मीटरच्या उत्कृष्ट थ्रोसह रौप्यपदक पटकावले. सचिन खिल्लारी याच्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून त्याचे कौतूक करण्यात आले आहे. पॅरालिम्पिकमधील अतुलनीय कामगिरीबद्दल सचिन खिलारीचे अभिनंदन! सामर्थ्य आणि दृढनिश्चयाच्या उल्लेखनीय प्रदर्शनात, पुरुषांच्या शॉटपुट F46 स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. भारताला अभिमान आहे. अशा अशयाचे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 34 वर्षीय सचिनने 16.32 मीटर गोळा फेकून स्वतःचा आशियाई विक्रम मोडला. जपानमध्ये मे २०२४ मध्ये झालेल्या जागतिक पॅरा-ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून त्याने विक्रम केला होता. त्यामुळे भारताच्या पारड्यात 21 पदके झाली आहेत.(Paralympics 2024: मराठमोळ्या Sachin Khilari ने रचला इतिहास, गोळाफेकमध्ये 16.32 मीटरच्या उत्कृष्ट थ्रोसह silver medal ची कमाई)

अतुलनीय कामगिरीबद्दल सचिन खिलारीचे अभिनंदन! 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now