IPL Auction 2025 Live

Cristiano Ronaldo ने मॅच गमावल्याच्या रागात सेल्फी घ्यायला आलेल्या चाहत्याचा फोन तोडला, आता जाहीर माफी मागून दिली ‘ही’ विशेष ऑफर

मैदानावरील या घटनेनंतर रोनाल्डोने रविवारी सोशल मीडियावर जाहीर माफी मागितली. 37 वर्षीय स्ट्रायकरने गुडिसन पार्कमध्ये एका तरुण चाहत्याचा फोन तोडला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. या घटनेबद्दल रोनाल्डोने इंस्टाग्रामवर माफी मागितली आहे.

क्रिस्टियानो रोनाल्डो (Photo Credit: Twitter)

Cristiano Ronaldo Outburst: मँचेस्टर युनायटेडचा (Manchester United) फॉरवर्ड क्रिस्टियानो रोनाल्डो याने शनिवारी एव्हर्टन (Everton) येथे 1-0 असा पराभव झाल्यानंतर एका समर्थकाच्या हातातून मोबाईल हिसकावून घेऊन तोडल्याबदल जगजाहीर माफी मागितली आहे. इतकंच नाही तर रोनाल्डोने आपल्या त्या चाहत्याला ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) येथे येऊन आगामी सामना पाहण्याची खुली ऑफर दिली आहे. या घटनेबद्दल रोनाल्डोने इंस्टाग्रामवर माफी मागितली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Cristiano Ronaldo (@cristiano)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)